Gud 2 Eat (MILLETS)

महाराष्ट्र शासनांकडून उत्कृष्ट ‘स्टार्टअप’ म्हणून राज्यपालांच्या हस्ते गौरव ज्वारी, बाजरी व नाचणी या भरडधान्यापासून फक्त ‘भाकरी’ बनविता येते. या पारंपरिक गृहितकाला छेद देत या धान्यांपासून पोहे, चिवडा, रवा, इडली- डोसा पीठ, चकली, शंकरपाळे आदी विविध आरोग्यवर्धक पदार्थ बनविण्याचा उद्योग देवळाली प्रवरा (ता.राहूरी) येथे सुरू झाला आहे. आगळी-वेगळी संकल्पना घेऊन सुरू केलेल्या ‘देवळाली प्रवरा’ येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांच्या ‘स्टार्टअप’च्या उत्पादनांनी सातासमुद्रापार भरारी घेतली असून महाराष्ट्र शासनाचा एक लाख रूपयांचा ‘उत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार’ ही राज्यपालांच्या हस्ते मिळाला आहे. यानिमित्ताने अहमदनगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने १५ ऑगस्ट २०२२ ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान राज्यात ‘महाराष्ट्र स्टार्टअप’ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तळागाळातील नवउद्योजकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे हा या ‘स्टार्टअप’ यात्रेचा उद्देश होता. या ‘स्टार्टअप’ यात्रेमध्ये महिला नवउद्योजक गटामध्ये सरोजिनी फडतरे यांच्या ‘मिलेट ट्रेडीशनल फुड फॉर हेल्थ’ (Millet traditional food for health) या संकल्पनेवर आधारित ‘स्टार्टअप’ उद्योगाला राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा एक लाख रूपयांचा पुरस्कार ही मिळाला. मुंबई येथे १८ ऑक्टोंबर २०२२ रोजी झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. सरोजिनी तात्यासाहेब फडतरे, समृद्धी ऍग्रो ग्रुप, राहुरी.

0Product Found

page of 0

0Product Found

Oops!

No matching results found

Looks like we couldn't find any matches. Try again!

All Categories